Loading...
99 22 903 695
chittaranjangaikwad72@gmail.com
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत
Responsive Image

आमच्याबद्दल

चित्तरंजन नाना व गौरीताई यांनी केलेली विकासकामांची यादी

कदमवाकवस्तीसाठी गौरीताई या नवसंजीवनी ठरल्या. ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविणारी पाणीपुरवठा योजना गावासाठी त्यांनी मंजूर करून घेतली. तब्बल 90 कोटी रुपयांची ही योजना ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवणार आहे. या पाणीपुरवठा योजनेचे पाईप्स गावात आले असून प्रत्यक्ष जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गौरीताई सरपंच झाल्यापासून कदमवाकवस्तीच्या विकासाचे मार्ग खुले झाले आहेत. प्रशमन शुल्क, विकास शुल्क, विलंब आकार मिळवण्यात कदमवाकवस्तीला प्रथमच यश लाभले आहे. विकासकर मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत म्हणून कदमवाकवस्तीला मान मिळाला आहे.

गावाची निर्मिती होऊन ५० वर्ष झाली तरी ही गावात अंतर्गत ड्रेनेज लाईन्स नव्हत्या. प्रथम मोठमोठ्या ड्रेनेज लाईन्स टाकून नंतर सोलिंग व कॉंक्रीटीकरण करून त्यावर उत्तम प्रकारचे रस्ते केले. येत्या 15 - 20 वर्षांत या रस्त्यांचे काम पुन्हा करावे लागणार नाही. सन 2017 ते 2022 या आपल्या कार्यकाळात संपूर्ण कदमवाकवस्तीमध्ये सुमारे 14 किमी. च्या ड्रेनेज लाईन्स आणि 15 किमी लांबीचे रस्ते त्यांनी पूर्ण केले आहेत. याशिवाय रस्त्यांची अनेक कामे प्रगतीपथावर असून लवकरच ती पूर्ण होतील. रस्त्यांची दुरावस्था दूर करून त्यांनी गावाचा चेहरामोहरा बदलून टाकलाय.

गावातील अंधार दूर करण्याच्या जिद्दीने त्यांनी गाव 1000 एलईडी लाईट्स बसवून गाव प्रकाशमय केले. आज गावातील प्रत्येक रस्त्यावर एलईडी लाईट्स बसविल्यामूळे महिलांसह सर्वांना सुरक्षित प्रवास करता येतोय. ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदा गावातील कंपन्यांचा सीएसआर फंड आपल्या गावाचा विकासासाठी सरपंच गौरीताईं यांनी मिळविला. हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडियन ऑईल यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला. यामधून गावातील हायवेवरील स्ट्रीट लाईट्स बसविण्यात आले. तसेच कचरा उचलण्यासाठी हायड्रॉलिक गाडी व २० मोठे डस्टबिन्स घेण्यात आले.

यापूर्वी गावाचा डीपी अर्थात डेव्हलपमेंट प्लॅन सन 1975 साली मंजूर झाला होता. त्यानंतर दर 20 वर्षांनी तो डीपी पुन्हा रिवाईज होणं गरजेचं होतं. पण सन 1995 व 2015 साली तत्कालीन राजकीय पुढार्यांुच्या उदासीनतेमुळे अथवा नाकर्तेपणामुळे तो काही रिवाईज झाला नाही. परिणामी गाव मागासलेलेच राहिले. नागरिकांना त्याच्या हक्काच्या सोई सुविधा आणि विकास कधी मिळालाच नाही. अन्यथा हे गाव केव्हाच विकासाच्या वेगळ्या उंचीवर पोहचलेलं असतं. पण सरपंचपदाची कमान गौरीताईंच्या हाती आल्यावर त्यांनी गावाचा सर्वांगिण विकास ज्यावर अवलंबवून आहे त्या डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यासाठी काम सुरु केले. डीपी प्रगतीपथावर असल्याने येणा-या काळात गावाची भरभराट आता वायुवेगानं होणार आहे. यामुळे गावातील आर झोन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन गावातील जमिनींच्या किंमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचा फायदा भूमिपुत्रांसह प्रॅापर्टी असणा-या प्रत्येकास होणार आहे.

आधीच्या सत्ताधा-यांनी सन 2012 ते 2017 या पाच वर्षात केवळ 3 घरकुले मंजूर केली होती. मात्र, गौरीताईंनी प्रथम प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी घरांचा सर्व्हे करुन घेतला. त्यातून तब्बल 439 जणांना घरकुले मंजूर देखील झाली आहेत. याशिवाय ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर येथील घरांचा प्रश्न अनेक दिवस रेंगाळलेला होता. मात्र, गौरीताई व नाना यांनी येथील तब्बल 200 घरे नियमित करुन नागरिकांना हक्काचे घर मिळवून दिले, त्याबद्दल सरपंच गौरीताई, युवा नेते चित्तरंजननाना यांचा या नागरिकांनी विशेष सत्कार करुन आभार व्यक्त केले.

पूर्वी गावाची कचरा वाहतूक व्यवस्था अतिशय निकृष्ट दर्जाची होती. पण गौरीताईंनी सूत्रे हाती घेतल्यानंतर कचरा उचलण्यासाठी नवीन 3 गाड्या घेतल्या. आदर पुनावाला यांच्याकडे पाठपुरावा करून कचरा व्यवस्थापनासाठी आपल्या गावामध्ये दोन गाड्या चालू केल्या.. तसेच सीएसआर फंडातून एक हायड्रॉलिक गाडी घेतली. या गाड्यांमूळे कचरा उचलण्याचे काम सोप्पे झाले. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात 20 डस्टबिन्स ठेवली आहेत. पीएमआरडीए कडे घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी जागेची मागणी त्यांनी केल्यानंतर प्रारूप विकास आराखड्यात कचरा प्रकल्पासाठी जागेचे नियोजन होणार आहे. त्यामूळे आता कचरा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी त्यांनी घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी जागोजागी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन त्यांनी केले. लहान झाडांना जाळ्या लावल्या तसेच प्रदूषित ओढे, नाले यांच्यातील गाळ व कचरा त्यांनी काढून घेतला.

नवपरिवर्तन फाऊंडेशन तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला. ई-श्रम कार्ड, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री सहायता योजना अश्या व इतर अनेक योजनांचा लाभ त्यांनी ग्रामस्थांना मिळवून दिला. ई-श्रम कार्ड योजनेअंतर्गत 'नवपरिवर्तन' च्या माध्यमातून त्यांनी तब्बल ३५०० असंघटितांची नोंदणी केली. तसेच सर्व नागरिकांना मोफत ई-श्रम कार्ड्सचे वाटप करण्यात आले.

कोरोना काळात गौरीताईंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गावातील प्रत्येक वॉर्डमध्ये ठराविक अंतराने 3 वेळा सॅनिटायझेशन केले. सर्व नागरिकांचे हेल्थ चेकअप करून बाधितांना क्वारंटाईन केले. गावातील सर्व नागरिकांना आरोग्य किटचे वाटप केले. कोरोनाच्या महामारीत त्यांनी विविध योजना प्रभावीपणे राबविल्या. यात प्रधानमंत्री आवास योजना, शरद भोजन योजना, आत्मनिर्भर भारत योजना अश्या योजनांचा समावेश होता. तसेच गावातील उद्योजक, सामाजिक संस्था यांना गोरगरीब जनतेला धन्य देण्याचे आवाहन केले. या माध्यमातून त्यांनी तब्बल 1500 नागरिकांना महिनाभर पुरेल एवढे धान्य दिले. गावातील नागरिकांना लसीकरणासाठी लोणी येथे जावे लागत होते. लसीकरणासाठी बरेच हेलपाटे मारावे लागत होते. यामुळे गौरीताईंनी गावातच लसीकरण केंद्र सुरू केले. परंतु या केंद्रावर स्थानिकांची दादागिरी चालू झाली. यासाठी ताईंनी ग्रामस्थांना न्याय देण्यासाठी टोकन सिस्टिम चालू केली. नागरिकांना लाईनमध्ये येऊन लस घेण्याचे आवाहन केले. यातून गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला व विरोधकांनी लसीकरण बंद पाडले. त्यांना न जुमानता जनसेवा न्यास, सिरम इन्स्टिट्यूट, बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक, नवपरिवर्तन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून पुन्हा लसीकरण सुरु केले. गावातील १०० टक्के लसीकरण पुर्ण करण्यासाठी इंडियन रेड क्रॉस कंपनीच्या माध्यमातून व्हॅनने गावातील लसीकरण पूर्ण केले.

दलितवस्ती सुधारणा या हेडमधून जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी दलित कुटुंबांचा सर्व्हे त्यांनी केला. त्यानुसार तब्बल 60 वस्त्या वाढविल्या. ग्रामपंचायत कामगारांचा 2 लाख रुपयांचा आरोग्य विमा काढला. यामुळे सर्व कामगार व त्यांचे कुटुंबिय समाधानी आहेत. ग्रामपंचायतीच्या एकूण करातील 5% रक्कम अपंग लाभार्थी योजनेच्या माध्यमातून दिली जाते व सर्व अपंगांची नोंद ग्रामपंचायतीत केली जाते.

महिला सुरक्षेसाठी गौरीताईंनी लक्षणीय कामे केली आहेत. उमेद समूह बचत गटाच्या माध्यमातून 70 बचत गट उमेद समूहाला जोडले व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना सभागृह दिले. याशिवाय बचत गटांच्या माध्यमातून महिलांना लघुउद्योगाचे प्रशिक्षण दिले. महिलांना शिलाई मशीन वाटप, प्रेशर कुकरचे वाटप केले. नवपरिवर्तन फाऊंडेशनच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबवत त्यांनी महिलांना ब्युटी पार्लर, मशीन क्लास, हाऊस कीपिंग, लॉजिस्टिक याबाबतचे प्रशिक्षण दिले. महिलांच्या सुरक्षेसाठी गस्तीपथकास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाडी दिली. ग्रामपंचायत कदमवाकवस्तीच्या माध्यमातून गावासाठी वैकुंठ रथ घेण्यात आला. स्ट्रीट लाईट दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नवीन क्रेन विकत घेतली. कदमवाकवस्तीमधील आंगणवाडीतील बालकांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी बोलक्या भिंती तयार केल्या. आंगणवाडीसाठी विविध साहित्य वाटप व कुपोषित बालकांसाठी पोषक आहार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिला जातो. युवा नेते मा.श्री.चित्तरंजननाना यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी भव्य होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांचा विविध बक्षिसं आणि भेटवस्तु देऊन आदर सत्कार करण्यात आला.तसेच बाळ मेळाव्या निमित्त चित्रकला स्पर्धेचं आयोजन करुन बाळगोपाळांना परिक्षेसाठी राईटिंग पॅडचे वाटप करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गरजू महिलांना पिठाची गिरणी, किशोरवयीन मुलींसाठी गावातील अनेक शाळांमध्ये सॅनिटरी पॅड मशीनचे वाटप, आंगणवाडीसाठी अग्निशमन यंत्र या साहित्याचे वाटप करण्यात आले. गौरीताईंच्या नवपरिवर्तन फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू लोकांना वैद्यकीय मदत मिळवून दिली जाते. विविध ऑपरेशन्ससाठी कक्षाच्या माध्यमातून सवलती मिळवून दिल्या जातात.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना 50,000 रुपयांची शासनाची मदत मिळवून देण्यासाठी त्यांना मोफत अर्ज भरून दिले. यातील बर्यानच जणांना ही मदत मिळाली. गावातील जुन्या ड्रेनेज लाईन्स तुंबत असत. ग्रामपंचायतीमार्फत जेटिंग मशीन घेऊन या समस्येवर परिणामकारक तोडगा गौरीताईंनी काढला. घोरपडे वसतीमध्ये पावसाच्या वारंवार शिरणार्याी पाण्याचा बीमोड करण्यासाठी त्यांनी 2 फुटी व 3 फुटी अश्या 2 ड्रेनेज लाईन्स टाकून हा प्रश्न तात्पुरता मार्गी लावला, येणा-या काळात हा प्रश्न लवकरच कायमस्वरुपी मार्गी लागेल.

Copyright © Chittaranjan Gaikwad, All Right Reserved.